नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 14:26 IST2019-03-20T14:25:35+5:302019-03-20T14:26:58+5:30
नालासोपारा शहरात खळबळ उडाली.

नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल
ठळक मुद्देराजेश पाल (२४) या तरुणाच्या फेसबुक अकाउंटवर सोमवारी मोदी यांचे असे फोटो मोहम्मद आसिफ नजीर, अवेकन इंडिया आणि आमीन लाघिरी या तीन फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आले.यासंदर्भात राजेश पाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा - पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्याने सोमवारी नालासोपारा शहरात खळबळ उडाली. तुळींज पोलिसांनी ते अपलोड करणाऱ्या तिघांविरोधात आणि एकाने शेअर केले म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
राजेश पाल (२४) या तरुणाच्या फेसबुक अकाउंटवर सोमवारी मोदी यांचे असे फोटो मोहम्मद आसिफ नजीर, अवेकन इंडिया आणि आमीन लाघिरी या तीन फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आले. तर साबीर-साबीर या अकाउंटधारकाने ते फोटो शेअर केले. यासंदर्भात राजेश पाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.