फाशीचा दिवस येतोय जवळ; निर्भयाच्या दोषींना तुरुंग प्रशासनाने विचारली शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:37 PM2020-01-23T15:37:42+5:302020-01-23T15:39:44+5:30

चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडले आहे.

The preparations for the execution began; Jail official Asked the guilty last wish | फाशीचा दिवस येतोय जवळ; निर्भयाच्या दोषींना तुरुंग प्रशासनाने विचारली शेवटची इच्छा

फाशीचा दिवस येतोय जवळ; निर्भयाच्या दोषींना तुरुंग प्रशासनाने विचारली शेवटची इच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देतुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, संपत्ती आदी गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांसंदर्भात काही निश्चित प्रक्रिया तुरुंग प्रशासनाला पूर्ण करणे गरजेच्या असतात.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषींकडून फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तिहार तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फाशीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी तुरुंग प्रशासनाकड़ून गुन्हेगारांनी त्यांची शेवटची इच्छा, संपत्ती आदी गोष्टींबद्दल माहिती विचारली जात आहे.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांसंदर्भात काही निश्चित प्रक्रिया तुरुंग प्रशासनाला पूर्ण करणे गरजेच्या असतात. अशा कैद्यांची शेवटी इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण करण्यात येते.निर्भयाच्या दोषी गुन्हेगारांना तुरुंग प्रशासनाकडून १ फेब्रुवारी रोजी फासावर जाण्याआधी ते कुणाची भेट घेऊ इच्छितात? त्यांच्या नावावरची मालमत्ता किंवा बँक खात्यातील रक्कम ते कोणाच्या नावावर करू इच्छितात? कुणाला वारसदार जाहीर करणार आहेत का? मृत्यूपत्र करणार आहेत का? कोणतं धार्मिक किंवा आवडतं पुस्तक वाचू इच्छित आहात का?, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

विनय शर्माने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने तिहार तुरुंगात शौचालयात गळ्याला फास आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. विनयला २४ तासांसाठी वैद्यकीय देखरेख कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगात सीसीटीव्ही फुटेज आणि कडक बंदोबस्त असतानाही विनयने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार बुधवारी सकाळी झाल्याचे विनय शर्माचे वकील ए.पी.सिंह यांचा दावा आहे. मात्र तुरुंगातील सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले आहे.

Nirbhaya Case : दोषी पवन अल्पवयीन असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

फाशीच्या भीतीने खाणं-पिणं सोडलं

चारही दोषींनी फाशीच्या भयाने खाणं-पिणं सोडलं आहे. चौघापैंकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यातुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे.चारही आरोपींना त्यांच्या इच्छेविषयी विचारल्या काहीच प्रतिक्रिया देत नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. चारही आरोपींनी गेल्या दोन दिवसांपासून खाणं-पिणंच सोडले आहे.
 

Web Title: The preparations for the execution began; Jail official Asked the guilty last wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.