समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराकडून वीजचोरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 23:28 IST2020-12-06T23:27:57+5:302020-12-06T23:28:24+5:30

Crime News : लेनाड गावाजवळ समृद्धी महामार्गाची कामे करण्यासाठी नेमलेल्या कंत्रादारांकडून मीटर न घेता बेकायदा वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले.

Power theft from Samrudhi Highway contractor | समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराकडून वीजचोरी  

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराकडून वीजचोरी  

शहापूर -  महावितरणचे सहायक अभियंता अविनाश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वीजचोरांविरोधात भरारी पथकाने कारवाई केली. त्यात लेनाड गावाजवळ समृद्धी महामार्गाची कामे करण्यासाठी नेमलेल्या कंत्रादारांकडून मीटर न घेता बेकायदा वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले. एकूण तीन ठिकाणी बेकायदा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यामध्ये सरासरी सहा हजार युनिटची वीजचोरी पकडली.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व अनेक गावांत पथकाने कारवाई केली आहे. त्यामध्ये ८६ लाख रुपये वीजचोरांकडून वसूल केले होते.
 

Web Title: Power theft from Samrudhi Highway contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.