शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कबरीतून मृतदेह बाहेर काढून महिलेचे केलं पोस्टमॉर्टम, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:46 IST

UP Crime News : महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील भगतपूर गावात रविवारी 3 महिन्यांनंतर एका महिलेचा मृतदेह कबरीतून (Grave)  बाहेर काढण्यात आला. त्याबाबत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी (Post mortem)  पाठवला आहे. या महिलेचा ३ महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाला होता. महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सासरच्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत तिचा मृतदेह पुरला होता. संशय आल्याने वरिष्ठ पोलिस (police) अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

उत्तराखंडमधील बरखेडा गावात राहणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिने आपल्या मुलीचे लग्न भगतपूर गावात राहणाऱ्या तरुणाशी केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आजपासून 3 महिन्यांपूर्वी मुलीच्या सासरच्यांनी फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मरण पावली, त्यावर सर्व कुटुंबीय भगतपूर गावात पोहोचले, त्यांनी पाहिले की, महिलेला येण्यापूर्वीच पुरण्यात आले आहे. याचा संशय सासरच्या मंडळींना आला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. 

४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...

त्याचवेळी भगतपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी लखपत सिंह यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीवरून महिलेचा मृतदेह स्मशानभूमीतून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुरावे गोळा करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरीकडे, एसपी देहत विधा सागर मिश्रा म्हणाले, 'भगतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यावेळी घरच्यांनी कोणतीही तक्रार दिली नव्हती. नंतर हुंड्यामुळे त्यांच्या मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. या अंतर्गत भगतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, 'महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे होते, त्यामुळे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, कारण यापूर्वी गुन्हा दाखल झाला नव्हता.  आता महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाच्या क्रमाने शवविच्छेदन आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नdowryहुंडाDeathमृत्यू