२७ वाँटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर्स केली जारी; लाखोंचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 15:50 IST2020-02-03T15:48:12+5:302020-02-03T15:50:06+5:30

या सर्वांवर १ लाखांपासून ते तब्बल २५ लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेल आहे.

Posters of Wanted 27 Naxalites released ; Announces the prize of lakhs of rupees | २७ वाँटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर्स केली जारी; लाखोंचे बक्षीस

२७ वाँटेड नक्षलवाद्यांचे पोस्टर्स केली जारी; लाखोंचे बक्षीस

ठळक मुद्देपोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. अलीकडेच पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.

झारखंड - झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या लातेहारसह आसपासच्या परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या, वॉन्टेड आणि ज्यांच्यावर लाखोंचे बक्षीस असलेल्या २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर्स अखेर लातेहार पोलिसांनी जाहीर केले आहेत. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या सर्वांवर १ लाखांपासून ते तब्बल २५ लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेल आहे.

लातेहार पोलिसांकडून ज्या २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत. अलीकडेच पलामू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी छतरपूर अनुमंडल येथून या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले नक्षलवादी हे टीपीसी संघटनेशी संबंधित आहेत.

झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना पोलिसांनी केले जेरबंद  

 

Web Title: Posters of Wanted 27 Naxalites released ; Announces the prize of lakhs of rupees