माजी आमदाराची पत्नी होती आत्महत्येच्या तयारीत? वाशी खाडीपुलाजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:02 IST2021-05-25T14:57:11+5:302021-05-25T15:02:46+5:30
Former MLA's Wife found police in depression : वाशी खाडीपूल मार्गावर मानखुर्द लगत शनिवारी हा प्रकार घडला.

माजी आमदाराची पत्नी होती आत्महत्येच्या तयारीत? वाशी खाडीपुलाजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात
नवी मुंबई : लातूर जिल्ह्यातील एका माजी आमदाराची पत्नी वाशी खाडीपूल लगत नैराश्य अवस्थेत पोलीसांना आढळून आली. कौटुंबिक वाद झाल्याने घरातून निघून त्या त्याठिकाणी आल्या होत्या. त्या आत्महत्येच्या तयारीत असाव्या अशा शक्यतेवरून पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
वाशी खाडीपूल मार्गावर मानखुर्द लगत शनिवारी हा प्रकार घडला. एक महिला पायी खाडीपुलावर चालत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. ती आत्महत्येच्या तयारीत असावी अशी शक्यता वर्तवत एका दुचाकीस्वाराने मानखुर्द पोलीसांना त्याची माहिती दिली. यानुसार पोलीसांनी त्या महिलेकडे जाऊन चौकशी केली असता, त्या एका माजी आमदाराच्या पत्नी असल्याचे समोर आले. तसेच कौटुंबिक वाद झाल्याने त्या नैराश्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. ऐरोली येथे राहणाऱ्या व लातूर जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या त्या पत्नी आहेत. यामुळे मानखुर्द पोलीसांनी वाशी पोलीसांना याबाबत कळवले असता, वाशी पोलीसांनी त्यांना धीर देत ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे.
महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी काढला व्हिडीओ अन् केला व्हायरल https://t.co/IOr0GDaPY2
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2021