गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 02:47 PM2020-10-20T14:47:40+5:302020-10-20T14:49:49+5:30

Goa Deputy Chief Minister Babu kavalekar : सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वुमन फॉरवर्डच्या सचिव क्लारा रॉड्रिक्स यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी गौरी गोवेकर, रेशल हरमलकर आणि मारिया कुएल्हो उपस्थित होत्या.

Porn video on WhatsApp group from Goa Deputy CM Chandrakant Kavlekar; Complaints Filed | गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार

गोवा उपमुख्यमंत्र्यांकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ; महिलांकडून विनयभंगाची तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सोमवारी दुपारी १.२० वाजता व्हॉट्सप ग्रुपवर पोर्न व्हिडिओ पाठवला. माझा फोन हॅक करुन मुद्दामहून आपली बदनामी करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केला, अशी तक्रार उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी क्राईम बँचकडे केली आहे. समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या.

पणजी: 'व्हिलेजेस ऑफ गोवा' या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोर्न व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात गोवा वुमन फॉरवर्डने पणजीच्या महिला पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. यामुळे आता कवळेकर यांनी माझा फोन हॅक झाला होता, मी झोपलेलो असे स्पष्टीकरण दिले आहे.  (Chandrakant Kavlekar)


सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वुमन फॉरवर्डच्या सचिव क्लारा रॉड्रिक्स यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी गौरी गोवेकर, रेशल हरमलकर आणि मारिया कुएल्हो उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सोमवारी दुपारी १.२० वाजता व्हॉट्सप ग्रुपवर पोर्न व्हिडिओ पाठवला. (Obscene message). या ग्रुपवर एकूण २४८ सदस्य असून या व्हाट्सअप ग्रुपवर अनेक कार्यकर्ते, महिला आणि नेते आहेत. कवळेकर यांनी पोर्न व्हिडिओ पाठवून ग्रुपवरील महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप रॉड्रिक्स यांनी केला आहे. कवळेकर यांच्याविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

बाबू म्हणतात, माझा फोन हॅक
माझा फोन हॅक करुन मुद्दामहून आपली बदनामी करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केला, अशी तक्रार उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी क्राईम बँचकडे केली आहे. त्यांनी ही तक्रार दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी केली. 'व्हिलेजेस ऑफ गोवा या ग्रुपवर रविवारी रात्री हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी तो कित्येकांनी पाहिला. समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. ग्रुप अॅडमिनने कवळेकर यांना ग्रुपमधून काढूनही टाकले. गदारोळानंतर कवळेकर यांनी क्राईम ब्रँचकडे तक्रार दिली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपला फोन हॅक करुन हा अश्लील व्हिडिओ टाकला, असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाला, त्यावेळी आपण गाढ झोपेत होतो, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कवळेकरांविरुद्ध काँग्रेसचीही पोलीस तक्रार
समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी प्रदेश काँग्रेसनेही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. कवळेकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 509 तसेच २००४ च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि६७ अ अन्वये कवळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read in English

Web Title: Porn video on WhatsApp group from Goa Deputy CM Chandrakant Kavlekar; Complaints Filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.