सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:08 IST2025-12-05T10:07:07+5:302025-12-05T10:08:01+5:30
इशिकाची हत्या दडवण्यासाठी पूनमने तिचा ३ वर्षाचा मुलगा शुभमला मारून टाकले. कुठल्याही आईला तिचा मुलगा गमावणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख आहे परंतु या आईने मुलाला जाणुनबुजून मारले जेणेकरून तिने केलेला पहिला गुन्हा लपवता येईल.

सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
पानीपत - हरियाणाच्या पानीपत येथील नौल्था गावात खळबळजनक घटना घडली आहे. अत्यंत हुशार, शिक्षित आणि शांत स्वभावाच्या महिलेने गेल्या २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला आहे. ज्यात तिच्या ३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाचा समावेश आहे. ती एकटी राहायची, समजूतदारपणे वागायची त्यामुळे तिने असं का केले हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. परंतु पोलीस तपासात तिने दिलेली कबुली आणि ज्या घटनांचा उल्लेख केला ज्याचा कुणीही विचार केला नाही.
ही कहाणी आहे ३२ वर्षीय पूनमची, MA. B.Ed शिक्षण घेतलेली अत्यंत हुशार, शांत स्वभावाची आणि कमी बोलणारी महिला होती. जी हळूहळू सायको किलर बनली. पोलिस तपासात पूनमने तिचा गुन्हा कबूल केला. ज्याने अधिकारीही हैराण झाले. या आरोपी महिलेला सुंदर बालकांचा राग यायचा. हे कशामुळे झाले याबाबत काही सांगितले नाही. तिच्या कुटुंबाने पूनम सर्वसामान्य असल्याचे सांगितले. तिच्यात मानसिक आजारपणासारखे काहीच नव्हते. ती कमी बोलायची, समजूतदार वाटायची असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले. परंतु तिच्या मौनामागे बरेच गूढ लपले होते. ज्यामुळे ती हिंसक झाली होती.
पूनमचं लग्न २०१९ साली झालं होते. २०२१ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव शुभम ठेवले. कुटुंब खुश होते परंतु हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. तिचा पती वॉशिंग सेंटर चालवायचा. सासू सासऱ्यांसोबत तिचे वाद होते. १३ जानेवारी २०२३ रोजी जेव्हा तिची नणंद माहेरी आली होती, तिची ११ वर्षाची मुलगी इशिकाही सोबत होती. त्यादिवशी घरात नेहमीसारखे वातवारण होते. मुलांच्या खेळण्याचा आवाज सुरू होता. पूनम त्या मुलीकडे कितीवेळ पाहत होती, तिच्या मनात काय सुरू होते हे कुणाला माहिती नव्हते. संधी मिळताच पूनमनं इशिकाला एकटे गाठले आणि पाण्याच्या हौदात बुडवून मारले.
इशिकाची हत्या दडवण्यासाठी पूनमने तिचा ३ वर्षाचा मुलगा शुभमला मारून टाकले. कुठल्याही आईला तिचा मुलगा गमावणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख आहे परंतु या आईने मुलाला जाणुनबुजून मारले जेणेकरून तिने केलेला पहिला गुन्हा लपवता येईल. कुटुंबाने तिच्यावर भरवसा ठेवला. कुणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. एका अपघाताने मुलांचा जीव गेल्याचं सगळ्यांना वाटले परंतु हा अपघात नव्हता. आईनेच मुलाला ठार केल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर अधिकारी हैराण झाले. त्यानंतर १८ ऑगस्ट २०१५ रोजी पूनम तिच्या माहेरी गेली होती. रात्रीच्या शांततेत पूनमने एका मुलीला झोपेतून उठवून जनावरांसाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात बुडवून मारले, हीदेखील दुर्घटना म्हणून तिने सगळ्यांना भासवले. त्यानंतर १ डिसेंबर २०२५ रोजी तिच्या कहाणीचा उलगडा झाला. विधी, ६ वर्षाची मुलगी होती. कुटुंब लग्नाच्या धावपळीत होते. पूनम विधीच्या मागे गेली आणि तिलाही एकटे गाठून पाण्यात बुडवून ठार केले. परंतु यावेळी तिच्यावर अनेकांना संशय आला. पोलिसांनी तिला अटक केली आणि कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले. विधी ही पूनमच्या दीराची मुलगी होती. मात्र तिलाही पूनमने संपवून टाकले. सध्या पोलीस या सर्व हत्येचा पुन्हा तपास करत आहे.