पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 12:14 IST2021-06-24T12:13:28+5:302021-06-24T12:14:02+5:30

Crime : हा थरार धरमपुरी वार्डात रात्री 10 च्या सुमारास घडला. मनोज गावडे असे गोळी झाडणाऱ्या शिपायाने नाव आहे.

A policeman shot dead his father-in-law | पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

अहेरी (गडचिरोली) : अहेरी येथील 'प्राणहिता' पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने आपल्या सासऱ्यावर बंदुकीतून गोळी चालवून त्याची हत्या केली. हा थरार धरमपुरी वार्डात रात्री 10 च्या सुमारास घडला. मनोज गावडे असे गोळी झाडणाऱ्या शिपायाने नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत इसम भामरागड तालुक्यातील रहिवासी असून ते काल बुधवारी मुलीच्या घरी भेटण्यासाठी आला होता. तो शिपायाचा सासरा आणि सख्खा मामाही आहे. रात्री हा थरार घडला त्यावेळी शिपायाची पत्नी, मुले घरीच होती. 

काही घरगुती वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि काही कळायच्या आत शिपायाने आपल्या सर्व्हिस रायफल मधून सासऱ्यावर गोळी झाडली. पोलिसांचा तपास सुरू असून सकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: A policeman shot dead his father-in-law