"ती बार गर्ल होती, एका फोनवर..."; रोहतक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:32 IST2025-08-05T16:25:42+5:302025-08-05T16:32:02+5:30

रोहतकच्या अजय आत्महत्या प्रकरणात दिव्याच्या प्रियकराने धक्कादायक खुलासा केला आहे.

Policeman accused in Rohtak death case seeks anticipatory bail from HC | "ती बार गर्ल होती, एका फोनवर..."; रोहतक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा खुलासा

"ती बार गर्ल होती, एका फोनवर..."; रोहतक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा खुलासा

Rohtak Ajay Magan Death Case: हरियाणातील रोहतकच्या मगन आत्महत्या प्रकरणातील आरोपी पत्नी दिव्याचा प्रियकर दीपकने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. रोहतक जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, हायकोर्टात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मगन उर्फ अजय याच्या आत्महत्येप्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिव्या आणि अजयची फेसबुकवरून मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेम सोशल मीडियावर फुलले. दिव्या आधीच विवाहित होती आणि तिला एक मुलगाही होता. तिने अजयपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. अजय आणि दिव्याने दिल्लीतील आर्य समाज मंदिरात कुटुंबियांच्या विरोधात प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दिव्याचे पोलीस अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध होती आणि त्यांचा एक अश्लील व्हिडीओ अजयला पाठवला होता.

हरियाणातील रोहतक येथील अजय सुहाग आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी दिव्याचा महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रियकर दीपक याच्याकडेही तपास सुरु केला आहे. रोहतक पोली त्याच्याशी फोनवर बोलले आहे. दीपकने संपूर्ण प्रकरणातून हात काढून घेतले आणि संपूर्ण प्रकरणासाठी दिव्याला जबाबदार धरले. दीपकने सांगितले की दिव्या ही एक बार गर्ल आहे, तिला तो पैसे देऊन हॉटेलमध्ये बोलावत होता. दिव्याशी या व्यतिरिक्त त्याचा कोणताही संबंध नाही. अजयच्या आत्महत्या प्रकरणाशीही त्याचा काहीही संबंध नसल्याचेही त्याने सांगितले.

१८ जून २०२५ रोजी अजय सुहागने व्हिडिओ बनवल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. व्हिडिओमध्ये त्याने त्याची पत्नी दिव्या आणि तिचा कॉन्स्टेबल प्रियकर दीपक यांच्यावर गंभीर आरोप केले. व्हिडिओ समोर आल्यानंतर, कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. या प्रकरणातील आरोपी दीपकच्या अटकेला हायकोर्टाने स्थगिती दिली, पण त्याला तपासात समाविष्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. 

दीपकने त्याच्या जबाबात म्हटले की दिव्या त्याच्या ठिकाणापासून सुमारे ४५० किमी अंतरावर राहत होती. ज्या दिवशी तो दिव्याला बोलवायचं असायचं त्या दिवशी तो तिला फोन करायचा. ती एका फोनवर येत असे. रोहतक पोलिसांनी दीपकचा जबाब नोंदवला असून  त्याचे उत्तर ४ सप्टेंबर रोजी हायकोर्टात सादर केला जाईल.

अजयच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओ समोर आले होते. एका व्हिडिओमध्ये दिव्या तिचा प्रियकर दीपकसोबत आरशासमोर उभी राहून इंस्टाग्राम रील शूट करताना दिसत आहे. यामध्ये दिव्या अंतर्वस्त्रांमध्ये होता तर, दीपकही अर्धनग्न होता. आणख एका व्हिडिओमध्ये दोघे हॉटेलमध्ये होते. ज्यामध्ये दिव्या अश्लील नृत्य करत होती आणि दीपक तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. कुटुंबीयांचा आरोप आहे की दिव्याने हा व्हिडिओ अजयला पाठवला होता. तो पाहिल्यानंतर त्याने आत्महत्या केली.

Web Title: Policeman accused in Rohtak death case seeks anticipatory bail from HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.