यवतमाळ - लोहारा येथे जनावरांची चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीला ग्रामस्थानी रंगेहाथ पकडून ९ जणांना लोहारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी चोरट्यांना घराबाहेर काढून पोलीस ठाण्यात चोप देत आणले. कुख्यात दारू तस्कर दीपक उर्फ भैय्या मनोहर यादव (वय - 28) , राहणार देवींगर लोहारा हा या टोळीचा म्होरक्या असल्याचा आरोप आहे.
जनावरांची तस्करी करणाऱ्या ९ जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 17:55 IST