शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पाच लाखाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:58 IST

तक्रार अर्जावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली. त्यानंतर पाच लाखाची लाच स्वीकारताना त्या उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले.

पिंपरी : तक्रार अर्जावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली. त्यानंतर पाच लाखाची लाच स्वीकारताना त्या उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. पुणे लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. २०) ही कारवाई केली.फारुख याकूब सय्यद सोलापूरे (वय ५६) असे रंगेहाथ पकडलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याअंतर्गत साने पोलीस चौकीला ते नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांनी चिखलीतील मोरेवस्ती परिसरात इमारत बांधली आहे. त्या इमारतीमधील सहा फ्लॅट त्यांनी विकले. मात्र, त्या संबंधित फ्लॅट धारकांकडून पैसे येणे बाकी होते. त्या संदर्भात तक्रारदार याने चिखली पोलीस ठाण्यात २९ मे २०२० मध्ये अर्ज केला होता. त्या अर्जावर चौकशी करण्याचे काम तेथे नेमणुकीस असलेले उपनिरीक्षक सोलापूरे याच्याकडे देण्यात आले. दरम्यान, त्या अर्जावरून असलेल्या तक्रारीवरून त्या फ्लॅट धारकांकडून पैसे काढून देण्यासाठी तसेच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांकडे पाच लाखाची मागणी केली. त्याची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दिली. त्यानुसार उपनिरीक्षक सोलापुरे पाच लाखाची रक्कम स्वीकाराताना रंगेहात पकडले गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस