अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:26 IST2021-07-15T21:25:56+5:302021-07-15T21:26:28+5:30
Crime News : यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलविला.

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी
चंद्रपूर : येथील सुमित्र नगर तुकुम परिसरात एका घरी भाडेकरू असणाऱ्या पियुष गोहणे ( 22) या युवकाचा मृत्यू झाला. कुटुंबीय व नातेवाईकांनी गुरुवारी दुपारी अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रा काही अंतरावर जाताच पोलिसांनी ऐन रस्त्यात गाठून अडविली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलविला.
अधिक माहिती घेतली असता पियुषने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांना सूचना न देताच परस्पर अंत्ययात्रा काढून मृतदेह स्मशानात अंत्ययात्रेसाठी नेत होते. ही अफलातून घटना चर्चेचा विषय ठरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. युवकाच्या प्रेयसीने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांना माहिती दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.
मौजमजेसाठी हवी होती मित्राच्या गळ्यातील सोनसाखळी; १४ वर्षीय मित्राची केली हत्याhttps://t.co/itcxcSlzCV
— Lokmat (@MiLOKMAT) July 15, 2021