Police seized 110 tonnes of government ration rice, that for the poor | गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला, ११० टन शासकिय रेशन तांदळाचा साठा पोलिसांनी केला जप्त

गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला, ११० टन शासकिय रेशन तांदळाचा साठा पोलिसांनी केला जप्त

ठळक मुद्दे भीमशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी आणि लक्ष्मण पटेल या आरोपींना ताब्यात घेतले. आता पुढील तपास पोलीस करीत आहे.

पनवेल - कोविड या संसर्गजन्य आजाराचामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. दरम्यान या संसर्गजन्य आजारांच्या काळात कोणत्याही व्यक्तीची उपासमार होवू नये म्हणून गोरगरिबांना  केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डवरील प्रति व्यक्तीस 5 किलो अन्न धान्य वितरण केला जात आहे. मात्र, बार्शी सोलापूर जिल्ह्यात गोरगरिबांना रेशन दुकानात वितरण करण्यासाठी आलेला तांदूळ पनवेलजवळील पळस्पेनजीक असलेल्या टेककेअर लॉजीस्टिक या गोडावूनमध्ये साठवून केली जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या पथकाने शुक्रवार रात्री गोडावूनमध्ये छापा टाकून ह ११० टन रेशनचा तांदुळ आणि चार कंटेनर जप्त करून भीमशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी आणि लक्ष्मण पटेल या आरोपींना ताब्यात घेतले. आता पुढील तपास पोलीस करीत आहे.या गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३३,०८,००० रूपये किंमतीचा रेशनिंग तांदुळाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या एकूण २२२० गोण्या (सुमारे ११० टन) यामध्ये Asian Rice लोगो असलेल्या व 1) Food Corporation of India 2) Government of Punjab 3)Government of Haryana असे नाव असलेल्या  गोण्या व दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी जप्त केला आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Web Title: Police seized 110 tonnes of government ration rice, that for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.