बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 21:05 IST2021-07-26T21:03:58+5:302021-07-26T21:05:53+5:30
Drug Case : पोलीस एजंटच्या शोधात

बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयात
सावंतवाडी : सावंतवाडीत गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून,या रॅकेटचे धागेदोरे हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पसरले असल्याचे पुढे येऊ लागले आहे. कुडाळ पोलीसा समोर या प्रकरणातील सुत्रधार बाॅबी हजर झाल्यानंतर पोलीस त्याचा सावंतवाडीतील साथीदार ऑगीच्या शोधात आहेत. या प्रकरणात सावंतवाडी व कणकवली येथील एंजट रडारवर असून अनेकजण नाव येण्याच्या भीतीने भुमिगत झाले आहेत.तर आपल्याकडे असलेला साठा ही नाहीसा करून टाकला आहे.
सावंतवाडी येथील गांजा रॅकेटची पाळे मुळे संपूर्ण जिल्हयात पसरली असून कुडाळ पोलिसांसमोर दिवसेदिवस वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने पोलीस ही चांगलेच चक्रावून गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेटची पाळेमुळे पसरली असून त्या दृष्टीने पोलिस शोध घेत आहेत. त्यातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आकेरी जवळ सावंतवाडीतील दोघां युवकांना ताब्यात घेतले यात मयूरेश कांडरकर व आशिष कुलकर्णाे यांचा समावेश होता तर अतुल उमेश गवस या युवकांला कुडाळ पोलीसांनी ताब्यात घेतले त्याच्या जबाबात सावंतवाडीतील बॉबी उर्फ फैैजल बेग यांचे नाव आले होते सध्यातरी बेग हाच मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीसांना वाटत असून त्याच्या घरात तब्बल ३ किलो गांजा आढळून आला होता या सर्वाना सोमवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान बाॅबीने एवढा गाज्याचा साठा कोठून घेतला कुणाला देत होता तसेच यात कोण कोण दलाली करीत होते. त्या सर्वाचा शोध पोलिस घेणार असून पोलिसांनी या गुन्हयात आरोपी भोवती चांगलाच फास आवळला असून. बाॅबी हा रविवारी पोलिसांसमोर हजर झाला पोलीसांनी त्याच्याकडून घेतलेल्या माहितीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात सध्यातरी बाॅबीला साथ देणारा ऑगी हा पोलीसांना हवा असून कुडाळ चे पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत आहे.मात्र त्याचा ठावठिकाणा अद्याप सापडला नाही ऑगी च्या व्यतिरिक्त आणखी सावंतवाडीतील काहि युवकही पोलिसांच्या रडारवर असून हे सर्व जण अमली पदार्थ बाहेरून आणून विक्री करत असल्याचे पोलीसाचे म्हणने आहे.