नागपूर : उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने कळमेश्वर (जिल्हा नागपूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी शिवारात सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’वर शनिवारी रात्री धाड टाकली.त्यात काहींना अटक करण्यात आली असून, घटनास्थळाहून नोटा मोजण्याच्या मशीनसह काही साहित्य जप्त करण्यात आले. ही नागपूर ग्रामीण पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. शिवाय, या कारवाईमुळे काही बड्या मंडळींची तसेच देहव्यापाराशी संबंधित आलेली काही मोठी नावे चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विक्रम कदम यांनी काही दिवसांपूर्वी याच शिवारातील ‘हुक्का पार्लर’वर धाडी टाकल्या होत्या.
‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांची धाड, नोटा मोजण्याच्या मशीनसह काही साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 20:58 IST