सुतावरून पोलिसांनी गाठला स्वर्ग! पती-पत्नी असलेल्या मुख्य आरोपीला गुजरातमधून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 19:42 IST2020-10-30T19:41:16+5:302020-10-30T19:42:21+5:30
Crim News : आर्वी पोलिसांची कारवाई

सुतावरून पोलिसांनी गाठला स्वर्ग! पती-पत्नी असलेल्या मुख्य आरोपीला गुजरातमधून केली अटक
वर्धा : कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना केवळ कदम काका या नावावरून पोलिसांनीगुजरातमधील सुरत (करार) येथून दोन मुख्य आरोपींना अटक केल्याच्या घटनेने मोठ्या प्रमाणात आर्वीत खळबळ उडाली आहे या पती-पत्नी आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे
संजय आराध्ये उर्फ कदम काका (48) आणि सोनल आराध्ये (33) राहणार सुरत (करार) असे या मुख्य आरोपींचे नाव आहे.आर्वी येथील अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून गुजरात येथे 19 महिन्यापूर्वी पळऊन नेले होते त्या प्रसंगी काही दिवसापूर्वीच गुजरात मधून तीन आरोपींना पोलिसांनी सुरत येथून अटक केली होती. मुलीला सुखरूप आईच्या हवाली केले होते
त्यानंतर मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला होता केवळ कदम काका यां नावावर पोलिसांनी ट्रेस करून त्याला गुजरात येथून अटक केली , यावरून आणखी काही सत्य बाहेर येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून या रॅकेटला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.