तीन स्पा सेंटरवर पोलिसांच्या धाडी; १९ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 22:06 IST2019-10-06T22:05:06+5:302019-10-06T22:06:23+5:30
छापे टाकून कारवाई करण्यात आली.

तीन स्पा सेंटरवर पोलिसांच्या धाडी; १९ जणांना अटक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील 3 स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे. शनिवारी उशिरारात्री इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या परिसरात काही स्पा सेंटर बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापे टाकून कारवाई करण्यात आली.
एवढेच नव्हे तर या स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटही चालविण्यात येत होते. ती माहिती मिळताच इंदिरापुरमच्या पोलिसांनी पथक तयार करून परिसरात सुरू असलेल्या 3 स्पा सेंटरवर छापे टाकले. छापे टाकल्याची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर, रात्रीच्या वेळी 3 वेगवेगळ्या स्पामधील 10 मुले आणि 9 मुलींना अटक करण्यात आली. रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या 10 मुला आणि 9 मुलींना चौकशीनंतर अटक करण्यात आली आणि तिन्ही स्पा सेंटरला सील ठोकण्यात आले.