पोलिसांची धाड! मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये तब्बल २४ बारबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:40 IST2019-07-15T20:35:29+5:302019-07-15T20:40:56+5:30
या प्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या चालक - मालकासह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांची धाड! मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये तब्बल २४ बारबाला
मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ चार गायिकांना परवानगी असताना मीरारोडच्या बारमध्ये तब्बल २४ बारबाला आढळून आल्या. त्याही मनाई असूनही सर्रास अश्लिल नाच करत होत्या. या प्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या चालक - मालकासह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली आहे.
मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत सिल्वर पार्क नाक्याजवळ एंजल पॅलेस नावाचा ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बारच्या आड आत मध्ये मोठ्या संख्येने बारबाला अश्लिल नाच करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांना मिळाली. त्यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक प्रकाश कांबळे सह विजय ब्राह्मणे, विलास गायकवाड, राणे, जमदाडे यांच्या पथकाने रवीवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सदर बारवर धाड टाकली.
धाडीत तब्बल २४ बारबाला अश्लिल नाच व हावभाव करताना आढळून आल्या. तर बारचे कर्मचारी त्यांना प्रोत्साहन देत होते. या प्रकरणी बारचा व्यवस्थापक, वेटर आदी ८ जणांना अटक करण्यात आली तर चालक - मालकाविरुध्द देखील गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. बारमधून सुमारे साडेसात हजारांची रोकड जप्त केली गेली आहे.