शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 6:24 PM

Police Raid on Dance Bar in Kashimira :

मीरारोड - कोरोनाने एकीकडे हाहाकार माजवला असताना लॉकडाऊन असून देखील काशीमिरा येथील एका ऑर्केस्ट्रा बार मध्ये चक्क आंबटशौकीन ग्राहकांची मैफिल रंगली . बंदी असून देखील शनिवारी पहाटे बार मध्ये कोरोनाचे नियम झुगारून मानसी बार मध्ये दिलबर ... दिलबर ... ह्या गाण्यावर अश्लील डान्स व नोटांची उधळण सुरू होती . तोच पोलिसांनी धाड टाकून ग्राहक व बार कर्मचारी असे एकूण १९ जणांना अटक करून बारच्या २ मालक - चालकांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे . (Police Raid on Dance Bar in Kashimira, Police arrested 19 people, including bar staff and customers)कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत असल्याने शासनाने हॉटेल - बार वर सुद्धा बंदी घातलेली आहे . तसे असताना काशीमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बार मध्ये चक्क नाचगाणी चालत असल्याची माहिती काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली. हजारे यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे सह राजेश पानसरे , दिनकर कोल्हे, जयदीप बडे, जयकुमार राठोड, अनिल नागरे, स्वाति देठे असे पथक शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मानसी बार वर कारवाईसाठी पाठवले . पथकाने बारच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला असता तेथे दिलबर...  दिलबर ... ह्या गाण्यावर बारबाला अश्लील नृत्य करत होत्या तर ग्राहक नोटा उडवत होते . पोलिसांच्या पथकास पाहून सर्वांची झिंग उतरली . 

बारच्या ६ कर्मचाऱ्यांसह १३ ग्राहक अशा १९ जणांना पोलिसांनी अटक केली . तर बार मध्ये सापडलेल्या ६ बारबाला व १ तृतीयपंथी यांची सुटका करण्यात आली . यापैकी ४ बारबालाना तर एका लहानश्या गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आले होते . 

पोलिसांनी अटक १९ जणांसह बारचा मालक रवी शेट्टी आणि श्याम कोरडे अश्या एकूण २१ जणां विरुद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक बार कर्मचारीत  विशाल पाठक, तिमआप्पा जोगी उर्फ महेशअण्णा, गोपाल गौडा, श्रीनिवास गौडा, रितेश सोनी, डाबोर सियाल यांचा समावेश आहे . 

तर  अटक केलेले आंबटशौकीन ग्राहक हे मुंबईच्या विलेपार्ले , कांदिवली , अंधेरी ,  माटुंगा , एल्फिस्टन तसेच ठाणे भागातील राहणारे आहेत.  आशिष जोशी, शैलेश झगडे, सुभाष झा, चिराग शाह, मयूर दाभोळकर, परेश मुजिंदरा, मौलिक शाह, जिग्नेश शाह, देविशंकर यादव, प्रकाश गनावत, रुपेश राठोड, भावेश पारेख, राजेश घारे अशी अटक ग्राहकांची नावे आहेत .  

बार मधून १ लाख ९१ हजारांची रोकड , दारूच्या बाटल्या आणि यंत्र साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे . बंदी असून देखील कोरोना संसर्ग पसरेल याची तमा न बाळगता डान्स बार चालवला जात असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे . या प्रकरणी बारवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस