विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याने केला दावा

By पूनम अपराज | Published: December 24, 2019 08:43 PM2019-12-24T20:43:30+5:302019-12-24T20:55:27+5:30

डीआयजी निशिकांत मोरे यांनी ईमेलद्वारे नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांना कळविली हकीकत

Police officer claims that the allegation of molestation is false | विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याने केला दावा

विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याने केला दावा

Next
ठळक मुद्देसुखविंदरसिंग यांनी केलेले आरोप धाधांत खोटे असल्याची माहिती डीआयजी निशिकांत मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन देणारअसल्याचे मुलीच्या वडिलांनी खारघर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पूनम अपराज

नवी मुंबई - खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एमटी विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांनी मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचे आरोप सुखविंदरसिंग यांनी केले. सुखविंदरसिंग आणि डीआयजी निशिकांत मोरे यांचे सलोख्याचे संबंध होते असून पैशाच्या व्यवहारावरून हे आरोप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सुखविंदर हे विनयभंगाची तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही तक्रार दाखल करून घेत जात नसल्याने लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन देणारअसल्याचे मुलीच्या वडिलांनी खारघर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अभिनेत्री डॉली बिंद्रा, मुंबई गुरुद्वाराचे मनजित सिंग आदी उपस्थित होते. मात्र, सुखविंदरसिंग यांनी केलेले आरोप धाधांत खोटे असल्याची माहिती डीआयजी निशिकांत मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

मोरे यांनी लोकमतला सांगितले की, सुखविंदर आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. सुखविंदरने दोन फ्लॅट बुक केले होते असून त्यातील एक फ्लॅट पैसे नसल्याकारणाने घेऊ शकत नसून त्याच्या बुकिंगचे पैसे फुकट जातील म्हणून त्याने आम्हाला घेण्यास सांगितला. त्यावर माझ्या पत्नीने २० लाख रुपये सुखविंदर यांना दिले. मात्र, बांधकाम बेकायदेशीर असून त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देखील मिळालेले नसल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही सुखविंदरकडे पैसे परत मागितले. मात्र, पैसे मागायला गेलेल्या माझ्या पत्नीला सुखविंदर यांच्या घराकडून वाईट वागणूक देण्यात आली. त्यावेळी मी पुण्यात होतो. दरम्यान, सुखविंदरसिंगची पत्नीने घरी येऊन माझ्या पत्नीची माफी मागितली. त्यावर एक माणुसकी ठेवत आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, आता प्रकरण उलटया दिशेने चालत असल्याने मी आजच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना मेलद्वारे हकीकत कळवली आहे. सत्य उघडकीस येईल असे मोरे यांनी सांगितले.  

तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले सुखविंदरसिंग मुखत्यारसिंग बाठ आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली. त्यामुळे एकमेकांच्या घरी ये-जा करत असत. दरम्यान जून महिन्यात सतरा वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केक कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले. मोरे यांच्या विरोधात तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करून घेतले नसल्याचा आरोप सुखविंदरसिंग यांनी सांगितले. मोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन देणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Police officer claims that the allegation of molestation is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.