शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलीस शिपायाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:55 PM

महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देशिपायाला बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक

पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी जवळीक प्रस्थापित केली. त्यानंतर महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाची मागणी केली असता तिला नकार दिला. याबाबत मोटार वाहन परिवहन विभाग पुणे शहर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही घटना २०१६ ते २०१८ या कालावधीत वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी याठिकाणी घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, शुभम गजानन मोहिते (रा. पाटील नगर, धनकवडी) असे अटक करण्यात आली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६ ते २०१८ या कालावधीत आरोपी शुभम याने फियार्दी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला. शुभम यांने आपल्यासोबत लग्न न केल्यास महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर महिलेने शुभमकडे लग्नाची मागणी केली. मात्र शुभम याने यास साफ नकार दिला. महिलेने याबाबत तक्रार केल्यास तिचे वडील आणि बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याची धमकी दिली. झालेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेने शुभम याच्या आई व बहिणीला सांगितला. त्याच्या आई आणि बहिणीने देखील महिलेला वाईट वागणूक दिली. याबाबत महिलेने दिघी पोलिसात धाव घेत बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस