पोलिस नाईक संजय बनसोडे यांची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:31 PM2020-06-14T14:31:31+5:302020-06-14T14:32:45+5:30

बनसोडे हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईकपदावर कार्यरत होते. वैयक्तिक कामामुळे दीड महिने रजेवर होते.

Police Naik Sanjay Bansode commits suicide in Pune | पोलिस नाईक संजय बनसोडे यांची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस नाईक संजय बनसोडे यांची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

पुणे : शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
पोलीस नाईक संजय बनसोडे (वय ३५, रा़ सोमवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. 


बनसोडे हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईकपदावर कार्यरत होते. वैयक्तिक कामामुळे दीड महिने रजेवर होते. गेल्या १५ दिवसांपासून ते पुन्हा कामावर हजर झाले होते. त्यांना जनरल ड्युटी देण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांना दारुचे व्यसन होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी दारु सोडली असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी नेहमीप्रमाणे ते ड्युटी करुन घरी गेले. त्यांची आई पुण्यात राहत असलेल्या मुलीकडे गेली होती. त्यांची पत्नी लॉकडाऊनपूर्वी माहेरी गेल्या आहेत. ते एकटेच घरी होते.

रविवारी सकाळी त्यांच्या आई संजय बनसोडे यांना फोन करत होत्या़. परंतु, त्यांनी तो उचलला नाही. तेव्हा आईने शेजारी राहणार्‍यांना संजय फोन उचलत नाही. तो घरात आहे का पाहण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी घरात पाहिल्यावर बनसोडे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व वरिष्ठ अधिकारी तातडीने घरी गेले. घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही़. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या....

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Web Title: Police Naik Sanjay Bansode commits suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.