CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 10:11 AM2020-06-14T10:11:04+5:302020-06-14T10:20:49+5:30

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ५० टक्क्यांकडे पोहोचत आहे.

CoronaVirus Marathi news 11929 patients found in last 24 hours; Amit Shah in active mode | CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

Next

नवी दिल्ली :  लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असताना तो उठविल्यानंतर लगेचच याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांनी तीन लाखांचा आकडा पार केलेला असतानाच आजची आकडेवारी देशाला चिंतेत टाकणारी आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. 


देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ५० टक्क्यांकडे पोहोचत आहे. दिल्लीतील गंभीर परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उप राज्यपाल, उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटात असलेल्या राज्यांना केंद्राची तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोनाबाधितांच्या रोजच्या संख्येत वाढ होऊ नये यावर लक्ष -
सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी नीती आयोगाचे सदस्य आणि मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेन्ट प्‍लॅनच्या ग्रुपचे, विनोद पॉल यांनी सध्याची स्थिती आणि संभाव्य स्थितीसंदर्भात सविस्‍तर प्रेझेन्टेशन केले.

पाच राज्यांतच दोन तृतियांश कोरोनाबाधित -
पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे, की "एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतियांश कोरोनाबाधित पाच राज्यांतच आहेत आणि तेही विशेषतः मोठ्या शहरांत. यावेळी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता बेड्सची  संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली." पंतप्रधानांनी शहर आणि जिल्यांतील रुग्णालये आणि आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भातही जाणून घेतले. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या....

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल

Web Title: CoronaVirus Marathi news 11929 patients found in last 24 hours; Amit Shah in active mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.