पोलीस नाईक सखाराम भोये यांची हत्या की आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 17:42 IST2020-12-31T17:41:18+5:302020-12-31T17:42:11+5:30
Suicide or Murder : तपास सीआयडीकडे देण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

पोलीस नाईक सखाराम भोये यांची हत्या की आत्महत्या?
वसई - तुळिंज पोलीस ठाण्यात कार्यरत मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी आठ दिवस उलटून ही ठोस माहिती समोर न आल्याने व पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होण्यासाठी हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीत विधानसभा उपाध्यक्ष व गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर संबंधित मंत्र्यांना दिल्याची माहिती लकीभाऊ जाधव यांनी लोकमतला दिली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ -3 मधील तुळिंज पोलीस ठाण्यातील मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी 24 डिसेंबर 2020 रोजी तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच सकाळच्या वेळी पिस्तुलाने स्वतः च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली होती.
या प्रकरणी तातडीने या घटनेची गंभीर नोंद घेत जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक होऊन त्यांनी या घटनेस तेथील पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी जबाबदार असून त्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वध, जातिवाचक आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे निवेदन गृहमंत्री व वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना भेटी वेळीं देण्यात आले होते.
दरम्यान सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत या प्रकरणी परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल.
तसेच भोये यांच्या कुटुंबाला शक्य होईल ती शासकीय मदत किंबहुना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द स्वतः वसई विरार पोलीस आयुक्तांनी त्यावेळेस आदिवासी विकास व विविध आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलं होतं. तुळिंज पोलीस स्टेशन येथे मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या जाचाला वैतागून आत्महत्या केली असल्याचा आदिवासी संघटना व भोये कुटुंबीयांचा आरोप व वजा संशय आहे.
त्यातून या प्रकरणी आठ दिवस उलटले तरी पोलीस निरीक्षकावर अद्यप कारवाई वजा या घटनेतील नेमकं सत्य समोर येत नाही त्यामुळेच पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना याचा उलगडा सीआयडी तपासात अधिक पारदर्शक होण्याची शक्यता अधिक असल्याने आदिवासी संघटनानी मुख्यमंत्री ठाकरे सहीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तसेच गृहमंत्री अनिल देशमुख आदीकडे सीआयडी तपासाची मागणी केली आहे.
चौकशी सुरू असलेले पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांची बदली ?
मयत सखाराम भोये आत्महत्या या गंभीर प्रकरणाची परिमंडळ 3 चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे, दरम्यान दि 30 डिसेंबर ला अचानकपणे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना मि भा व वि आयुक्तांलयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे आणि तसे आदेश पोलीस आयुक्तांलय यांनी काढले आहेत.