शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 8:09 PM

Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण देश हादरून गेलेल्या घटनेत विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भीषण आग लागून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटना घडली. या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी आज दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 

विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप

 

शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 15 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि यात मृतांचे कुटुंबीय, नातलग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना इतकी भीषण होती की,यामुळे वसई-विरार शहरच नाही तर अवघ्या राज्य व केंद्रीय प्रशासन ही या घटनेमुळे गहिवरले. सर्वत्र देशभर याचे पडसाद उमटले व शोककळा पसरली. या घटनेनंतर मृतांच्या वारसांना शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. परिणामी या घटनेनंतर विजय वल्लभ  रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी आदी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला.

मात्र एवढे करून चालणार नाही तर या 15 रुग्णांच्या घटनेस जे कोणी प्रमुख जबाबदार आहेत त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत अशोक शेळके यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य शासनाने अग्निशमन विभागाची सखोल चौकशी करून आजपर्यत (फायर ऑडिट) का करण्यात आले नाही? यास जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :fireआगVirarविरारVasai Virarवसई विरारPoliceपोलिसArrestअटकhospitalहॉस्पिटल