बनावट आधारकार्ड देणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:14 IST2018-08-16T18:13:33+5:302018-08-16T18:14:43+5:30
गुन्हे शाखेच्या परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला आहे.

बनावट आधारकार्ड देणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक
मुंबई - बनावट कागदपत्रांच्यासाहाय्याने नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी चार जणांना मंगळवारी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. राहुल नवीनचंद्र पांचाळ, तपेंद्र मोती आऊजी, संजय शंभू कानडे, इम्रान अहमद सुल्तान अहमद शेख अशी या चौघांची नावे आहेत. चौघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीकडे बनावट कागदपात्रांच्याआधारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि चार आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला आहे.