नात्याला काळीमा! भाऊच निघाला बहिणीचा खूनी; सत्य उघड होताच पोलीसही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:17 IST2021-11-18T16:17:11+5:302021-11-18T16:17:29+5:30
बाथरुममध्ये युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर विशाल आणि त्याच्या कुटुंबाने आयोजक आणि शिपाई यांच्यासोबत वाद घातला.

नात्याला काळीमा! भाऊच निघाला बहिणीचा खूनी; सत्य उघड होताच पोलीसही झाले हैराण
मेरठच्या रेड कार्पेट बॅक्वेंट हॉलमध्ये नवरदेवाच्या भाचीची हत्या झाली. याबाबत खळबळजनक खुलासा बाहेर आला आहे. गुन्हेगार अन्य कुणी नसून मुलीचा मावसभाऊ विशाल गुप्ता असल्याचं उघड झालं. युवतीसोबत विशालने बलात्काराचा प्रयत्न केला होता. मुलीने विशालला विरोध केल्यानंतर त्याने गळा दाबून त्याची हत्या केली. भावनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा याचा खुलासा झाला.
सोमवारी रात्री बॅक्वेंट हॉलमध्ये नवऱ्याच्या भाचीची हत्या झाली होती. कुटुंबाने तिच्यावर बलात्कार करुन हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल गुप्ता लग्नाच्या समारंभावेळी मुलीच्या रुममध्ये गेला होता. त्याठिकाणी त्याने मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने विरोध केला असता त्याने तिची हत्या केली. घटनेनंतर तो मंडपाच्या बाहेर गेला आणि २ तासाने पुन्हा लग्न समारंभात पोहचला. युवती बेपत्ता असल्याचं कळताच कुटुंबासह विशालही तिचा शोध घेण्याचं नाटक करू लागला.
तेव्हा बाथरुममध्ये युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर विशाल आणि त्याच्या कुटुंबाने आयोजक आणि शिपाई यांच्यासोबत वाद घातला. युवतीची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांना विशालच्या हालचालींवर संशय आला त्यांनी विशालला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा वेगळंच सत्य उघड झालं. आरोपी विशाल गुप्ता हा त्याच्या मावस बहिणीवर एकतर्फी प्रेम करत होता. बाथरुममध्ये युवती ओरडायला लागली म्हणून विशालने तिचा गळा दाबला. मुलीच्या मृत्यूनंतर विशालने तेथून पळ काढला. पोलिसांसमोर हा खुलासा होताच दोन्ही कुटुंबाच्या माना शरमेने खाली गेल्या. पोलिसांनी विशाल गुप्ताचं मोबाईल रेकॉर्डिंग चेक केले. युवतीकडे मोबाईल नव्हता. विशाल युवतीचा भाऊ आणि आईच्या मोबाईलवरुन तिच्याशी बोलत होता. विशाल मावस भाऊ असल्याने कुणालाही संशयही आला नाही. विशालच्या डोक्यात नेमकं काय सुरु आहे याचा अंदाज युवतीला नव्हता.
विशाल गेल्या २ महिन्यापासून युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. युवतीच्या मामाच्या लग्नात दोघंही लग्न समारंभात पोहचले. रात्री ८ वाजता युवती लग्नात व्यस्त होती. तेव्हा संधी मिळताच विशाल तिच्याकडे पोहचला आणि रुममध्ये जाण्याचा बहाणा बनवला. युवतीने त्याला नकार दिला. त्यानंतर पुन्हा ९.३० च्या सुमारात तिला बहाणा बनवून रुममध्ये घेऊन गेला. युवती बाथरुमला गेली तेव्हा विशालने तिचा पाठलाग करत दरवाजा आतून बंद करत तिला पकडलं. युवतीने ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा विशालने तिचा गळा आवळला. युवतीचा मृतदेह बाहेर नेण्याचा प्रयत्न विशालने केला परंतु तो अयशस्वी राहिला. बाथरुममध्ये १५-२० मिनिटं युवती आणि विशालमध्ये वाद झाला. परंतु युवतीच्या ओरडण्याचा आवाज कुणालाच ऐकायला आला नाही. मात्र विशालने खून केल्यानंतर तेथून पळाला आणि तेवढ्यात नशेच्या अवस्थेत शिपाई त्या रुममध्ये येऊन बेडवर झोपला. पण जेव्हा जाग आली तेव्हा सगळ्यांनी शिपायालाच पकडले.