Police found the mobile which was fall from train hint of ringtone | रिंगटोनच्याआधारे लोकलमधून पडलेला मोबाइल रेल्वे पोलिसांनी शोधून दिला
रिंगटोनच्याआधारे लोकलमधून पडलेला मोबाइल रेल्वे पोलिसांनी शोधून दिला

ठळक मुद्दे कर्तव्यावरील पोलिसांनी त्या महिलेला तो मोबाइल शोधून दिला. फोनच्या रिंगटोनच्या आधारे पोलिसांनी मोबाइलचा शोध घेतला. ज्योती कसबे या ९ नोव्हेंबर रोजी कुर्ला ते वाशी असा प्रवास करत होत्या.

मुंबई - हार्बर मार्गावरील टिळकनगर ते चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशाचा लोकलमधूनमोबाइल पडला. कर्तव्यावरील पोलिसांनी त्या महिलेला तो मोबाइल शोधून दिला.

ज्योती कसबे या ९ नोव्हेंबर रोजी कुर्ला ते वाशी असा प्रवास करत होत्या. लोकलच्या दरवाज्याजवळ उभ्या असताना टिळकनगर ते चेंबूर स्थानकादरम्यान त्यांच्या हातातून मोबाइल पडला. त्यानंतर, तिने स्वत: त्या ठिकाणी जाऊन मोबाइलचा शोध घेतला. मात्र, मोबाइल सापडला नाही. ज्योतीने टिळकनगर स्थानकावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलीस नाईक सुनील पाटील, पोलीस शिपाई बसवराज निगदळी आणि महिला पोलीस शिपाई पुजा दिवटे यांनी मोेबाइलचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्योतीचा मोबाइल क्रमांक घेऊन पोलिसांनी त्यावर फोन करणे सुरू केले. फोनच्या रिंगटोनच्या आधारे पोलिसांनी मोबाइलचा शोध घेतला. मोबाइल टिळकनगर ते कुर्ला या दरम्यान सापडला.

Web Title: Police found the mobile which was fall from train hint of ringtone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.