जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:20 IST2020-03-05T22:18:14+5:302020-03-05T22:20:56+5:30
तीन तासांपासून त्या कारमध्ये मौजमजा करणारे तीन तीन पोलीस अडकून राहिले.

जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला
उत्तर प्रदेश - जप्त केलेल्या स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) कार घेऊन फिरणं, मौजमजा करणं पोलिसांच्या अंगलट आलं आहे. जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार मालकाने ट्रक करून कार लॉक केली. त्यामुळे तीन तासांपासून त्या कारमध्ये मौजमजा करणारे तीन तीन पोलीस अडकून राहिले.
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यातील ही घटना आहे. उत्तर प्रदेशची राजधानी पासून १४३ किलोमीटर अंतरावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील नवीन बस्ती गावात गाडी मालकाने आपली कार ट्रॅक केली आणि लॉक केली. त्यामुळे अंजना पोलीस तीन तासांपेक्षा जास्त काळ एसयूव्ही कारमध्ये अडकले होते. लखनऊच्या गोमतीनगर पोलीस ठाण्यात हे पोलीस तैनात आहेत, त्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन हवालदार आहेत. बुधवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका खटल्याची चौकशी करण्यासाठी हे तीन पोलीस २०१८ चे 2018 मॉडेल असलेल्या एसयूव्ही कारमधून तपास करण्यास निघाले होते. मंगळवारी रात्री पोलिसांनी दोन पक्षांतील वादामुळे एसयूव्ही ताब्यात घेतली होती.
कारच्या मालकाने त्याच्या कारचा गैरवापर केल्याची तक्रार लखनऊ पोलिसात दिली आहे. लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर) गोमतीनगर, प्रमेद्रकुमार सिंग यांना घटनास्थळी पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल."