शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मरता मरता वाचले पोलीस; नायझेरियन तस्करांनी केला पोलिसांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 4:24 PM

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

 

मुंबई - मुंबईत अमली पदार्थांविरॊधातील कारवाया दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये परदेशी नागरिक असलेल्या नायझेरियन तस्करांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भायखळा येथील सिग्नलजवळ असलेल्या खडापारसी परिसरात सतत वावरत असलेल्या तस्करांवर काल अमली पदार्थाविरोधी विभागाचे पोलीस  अधिकारी कारवाईसाठी गेले असताना मोठ्या प्रमाणात असलेल्या नायझेरियन तस्करांनी पोलिसांवरच हल्ला करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नायझेरियन तस्करांनी केलेल्या हल्यात तीन पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी जे.जे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भायखळाच्या रेल्वे वसाहतीजवळील बरकले कंपाउंडजवळ दररोज मोठ्या प्रमाणात नायझेरियन अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असतात. याबाबतच्या तक्रारी अमली पदार्थविरोधी विभागाच्या 'दक्ष नागरिक' या हेल्पलाईनवर येत होत्या. विशेष म्हणजे हे नायझेरियन ज्या रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वावरत असतात त्या रेल्वे पोलिसांनी स्वत: कारवाई करायचे सोडून एएनसीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली होती. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत वरळीच्या एएनसी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी त्यांचे पथक शुक्रवारी राञी ८.३० वाजातच्या सुमारास पाठवले. य़ा पोलिसांच्या पथकात एकूण बाराजण होते. पोलिस राञी ९.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहचले असता भायखळाच्या बरकाले कंपाउंडजवळ एक नायझेरियन महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थ देऊन पैसे घेऊन रेल्वे रुळाच्या दिशेने जात होता. 

त्यावेळी साध्या वेशात असलेले  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, अमर मराठे, पोलिस काँन्स्टेबल रविंद्र मते, दत्ताराम माळी, राजू तडवी यांनी त्या नायझेरियनला पकडले. पोलिसांनी पकडल्यानंतर धिप्पाड देहाच्या त्या नायझेरियन तरुणाने स्वत: ची सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने रुळावर बसलेल्या त्याच्या इतर २० साथीदारांनी त्या दिशेने धाव घेतली. साध्या वेशात पोलिस कारवाई करण्यासाठी आल्याचे लक्षात आल्यानंतर नायझेरियन तरुणांनी पोलिसांच्या दिशेने रुळावरील दगड भिरकवण्यास सुरूवात केली. काही पोलिस तस्करांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर काही तस्कर पोलिसांना घेरून मारू लागले.  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण आणि अमर मराठे यांना तेथील सात ते आठ तस्करांनी विळखा घालून मारत होते. झटापटीत मराठे हे खाली पडले असताना एका नायझेरियन तस्कराने मोठा दगड मराठे यांच्या डोक्यात टाकला. यावेळी मराठे यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव होऊ लागला. तो नायझेरियन पुन्हा मराठे यांच्या डोक्यात दगड टाकणार तोच मराठे आणि चव्हाण या अधिकाऱ्यांनी त्या तस्करांना धक्का देऊन त्यांच्या तावडीतून पळ काढला.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र