ऑनलाईन जुगारावर पोलिसांची कारवाई; तिघांना अटक, २ फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 20:54 IST2021-08-14T20:50:12+5:302021-08-14T20:54:21+5:30
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली.

ऑनलाईन जुगारावर पोलिसांची कारवाई; तिघांना अटक, २ फरार
मीरारोड - स्किलइंडिया गेम.कॉम या नावाचे वेबपेज तयार करून त्या आधारे लोकांची ऑनलाईन फसवणूक करून जुगार, लॉटरी चालवणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. भाईंदर पूर्वेस अन्नपूर्णा हाईट्स जवळ असलेल्या आर्काइन्वेस्टमेंट येथे ऑनलाईन जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाड टाकून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी वापरत असलेले संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. उर्वरीत २ आरोपींचा तपास सुरू आहे.