पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेणारा पोलीस जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:24 PM2019-06-22T15:24:58+5:302019-06-22T15:26:04+5:30

पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली़..

The police caught accepting bribe of verification for passport | पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेणारा पोलीस जाळ्यात

पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेणारा पोलीस जाळ्यात

Next

पुणे : पासपोर्ट पडताळणीसाठी लाच घेताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागने पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून पकडले़. 
नागनाथ नामदेव भालेराव असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे़. तक्रारदार यांच्या पासपोर्टच्या पडताळणीचे काम होते़. त्यासाठी त्यांनी भालेराव यांच्याशी संपर्क साधला़. पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली़. तेव्हा पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली़. तडजोडीत तक्रारदारांकडून २ हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सापळा लावून भालेराव याला १ हजार रुपयांची लाच स्विकारताना पकडले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रतिभा शेंडगे, उदय ढवणे, मुश्ताक खान, वैभव गोसावी, अभिजीत राऊत आदींनी ही कारवाई केली.

Web Title: The police caught accepting bribe of verification for passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.