शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी पोलीस बनले वेटर; बंगळुरूच्या हॉटेलमध्ये थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 01:18 IST

सराईत गुन्हेगाराला पहिल्यांदाच झाली अटक

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  भाड्याने घेतलेल्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांना वेटरची भूमिका करावी लागली. बंगळुरू येथील हाॅटेलमध्ये तीन दिवस वेटर बनून पाळत ठेवली. त्यानंतर ताे नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल असून, पहिल्यांदाच त्याला अटक झाली. 

टोळीचा सूत्रधार अँथोनी पॉल हा असून त्याच्या टोळीने अंधेरी येथे नवे कार्यालय सुरू करून भाड्याने देण्यासाठी गाड्या जमा करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण कोपरकर यांनी तिथे पाळत ठेवली. या वेळी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्याच्याच शेजारची खोली पोलिसांनी भाड्याने घेतली. या वेळी सहायक निरीक्षक राजेश गज्जल, लक्ष्मण कोपरकर, ऊर्मिला बोराडे व राहुल वाघ हे त्या ठिकाणी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान त्या ठिकाणी तळ ठोकून होते. ५ तारखेला तो पत्नीला भेटायला आला असता पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत मुख्य सूत्रधार अँथोनी पॉल याच्याविषयी माहिती मिळाली. पॉल हा दुबईचे मोबाइल सिम वापरून सर्वांना चकमा देत होता. ताे बंगळुरू येथे हाॅटेलमध्ये राहत असल्याचे समजले.  

३०० हून अधिक गाड्या विकल्याची शक्यतापोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ गुजरात येथे ठिकठिकाणी छापे मारून विकलेल्या चोरीच्या २० गाड्या जप्त केल्या. या टोळीने राज्यभरातून ३०० हून अधिक गाड्या चोरून गुजरात व इतर राज्यांत विकल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पथक सलग २५ दिवस कार्यरत होते.

टॅग्स :Policeपोलिस