महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश
By पूनम अपराज | Updated: August 2, 2022 14:16 IST2022-08-02T13:47:47+5:302022-08-02T14:16:57+5:30
Child trafficking : याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश
पूनम अपराज
मुंबई : एका 35 वर्षीय महिलेला आणि तिच्या महिला साथीदाराला 15 दिवसांच्या चिमुरडीला 4.5 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी ज्युलिया फर्नांडिस हिच्यावर मानवी तस्करीच्या अनेक केसेस आहेत. तसेच जीटीबी नगर येथील आनंद नगरमधील अहाना नर्सिंग होममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. येथून २ मोबाईल आणि २ हजार रुपयांसह महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोंढवा येथील दत्तक केंद्रात काम करणारे आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) चे सदस्य असलेल्या जयप्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एक महिला नवजात मुलीसाठी खरेदीदार शोधत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक महिला आणि बालकल्याण प्राधिकरणाला सतर्क केले. त्यावरून ही पुढे कारवाईस चालना मिळाली.
