प्रसिद्ध बबन वडा पावमध्ये सापडली पाल, पोलीसांनी तीन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 19:32 IST2018-08-23T19:31:12+5:302018-08-23T19:32:20+5:30
बबन वडा पावमध्ये सापडली पाल, पोलीसांनी तीन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

प्रसिद्ध बबन वडा पावमध्ये सापडली पाल, पोलीसांनी तीन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
अंबरनाथ - अंबरनाथमध्ये प्रसिद्ध बबन वडा पावच्या वड्यामध्ये पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून ‘बबन वडा पाव’चा मालक बबन पटेल आणि त्याच्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंरबनाथमध्ये बबन वडा पाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी खवय्यांची खूप गर्दी असते. नेहमीप्रमाणे या ठिकाणी वडा-पाव खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या वड्यात पाल असल्याचे आढळल्याने मोठा वाद-विवाद निर्माण झाला. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आल्यानंतर पोलिसांनी बबन वडा पावच्या मालकाला आणि कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.