शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 15:47 IST

कोथरुडमधील एका इंग्लिश मीडियम स्कुलमधील तीन विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़.

ठळक मुद्देतीनही विद्यार्थिंनी वेगवेगळ्या वर्गात शिकत असून त्यातील दोन मुली १३ व एक १५ वर्षाचीअनेक महिने या मुलींनी हा प्रकार कोणाला न सांगता त्याचा जाच सुरु

पुणे : कोथरुडमधील एका इंग्लिश मीडियम स्कुलमधील तीन विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़. शाळेच्या शिपायाच्या या कृत्याने वैतागून या मुलींनी शाळेकडे तक्रार केली होती़. वडिलांना या प्रकाराची माहिती दिली़. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी शाळेकडे लेखी तक्रार केली़. त्यानंतर शाळेने कोथरुड पोलीस ठाण्यात शिपायाविरुद्ध फिर्याद दाखल केली़. संभाजी रघुनाथ चौधरी (वय ४७, रा़ शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिपायाचे नाव आहे़. ही घटना ३ फेबुवारी ते ५ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान घडली होती़. याबाबत पोलिसांनी सांगितले की,कोथरुड येथील पी बी जोग इंग्लिश स्कूलमधील तीन विद्यार्थिंनीसोबत तेथील शिपायाने हा प्रकार केला होता़.या तीनही विद्यार्थिंनी वेगवेगळ्या वर्गात शिकत असून त्यातील दोन मुली १३ वर्षाच्या एक १५ वर्षाची आहेत़. चौधरी याने या तिघींना वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी नेत जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ दाखविला होता़. त्यानंतर त्यांना शिवीगाळ केली़. सातत्याने अशा प्रकारे तो त्रास देत होता़. याबाबत कोणाला सांगू नये, अशी तो सर्वांना धमकी देत होता़. त्यामुळे अनेक महिने या मुलींनी हा प्रकार कोणाला न सांगता त्याचा जाच सहन केला होता़. त्याच्या या कृत्यांने वैतागून शेवटी त्यांनी शाळेच्या प्रमुख अधिकारी राजलक्ष्मी कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली़. त्यानंतर या मुलींनी आपल्या आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली़. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी शाळेकडे लेखी तक्रार केली़. 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळ