पुणे : कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री भर रस्त्यावर बेशिस्त वर्तन करत पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनीअटक केली आहे़. प्रभज्योतसिंग दिलबागसिंग (वय ४६, रा. डेक्कन गोल्ड अपार्टमेंट, युआन आयटीपार्क जवळ, खराडी) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सिंग बेशिस्त वर्तन करत होता. त्यावेळी हा प्रकार सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिंग याला जाब विचारला़ त्यावर त्याने या रहिवाशांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणारे पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत या तेथे आल्या. त्यानंतर तक्रारादार रहिवासी जितेंद्र बडेकर, त्यांचा मित्र प्रफुल्लकुमार चव्हाण यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांना सिंग याने धमकी दिली. त्याला पोलीस आणि रहिवासी समजावून सांगत होते. मात्र तरीही तो त्यांना जुमानत नव्हता़ त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग याला अटक करण्यात आली़
कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:05 IST
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर रहिवाशांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.
कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला अटक
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग याला अटक