पुणे विद्यापीठ चाैकात गाेळीबार करणारा पाेलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:21 PM2018-08-18T15:21:43+5:302018-08-18T15:25:41+5:30

पुणे विद्यापीठाच्या चाैकात एकावर गाेळीबार करणाऱ्याला पकडण्यात पाेलिसांना यश अाले अाहे.

police arrest the shutter of pune university circle incident | पुणे विद्यापीठ चाैकात गाेळीबार करणारा पाेलिसांच्या ताब्यात

पुणे विद्यापीठ चाैकात गाेळीबार करणारा पाेलिसांच्या ताब्यात

Next

पुणे : पुणे विद्यापीठात चौकात तरुणावर गोळीबार करुन पळून गेलेल्या आरोपीला  नाकाबंदीत तातडीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़. शुक्राचार्य मधाळे असे त्याचे नाव आहे़. 

    पुणे विद्यापीठ चौकात समीर किसन येनपूरे (रा़ गणेशनगर, मेहंदळे गॅरेजजवळ, एरंडवणा) या व्यावसायिकावर गोळीबार करुन दुचाकीवरुन मधाळे हा पळून जात होता़, तो दुचाकीवरुन पाषाणकडे गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी केली़.  त्याचवेळी एका दुचाकीवरुन बावधन करुन पाषाणकडे दोघे जण जात होते़ त्यांनी नाकाबंदी ओलांडल्यावर तेथे असलेले पोलीस कर्मचारी अतुल इंगळे व शिवाजी आयवळे यांना पाठीमागे बसलेल्याच्या कमरेला शस्त्र लावले असल्याचे दिसले़, ते पाहून त्यांनी आपल्या दुचाकीवरुन पाठलाग करण्यास सुरुवात केली़. सुमारे एक ते दीड किलोमीटरवर त्यांनी पाषाणाच्या मारुती मंदिराजवळ त्याच्या पुढे गाडी घालून थांबायला लावले़ त्याच्याकडील पिस्तुल ताब्यात घेतले़. त्याला नाव विचारल्यावर त्याने शुक्राचार्य मधाळे असे सांगितले़ ते सांगताच गोळीबार करणारा हाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ ते त्याला घेऊन पाषाण पोलीस चौकीत आणले. 

     शुक्राचार्य मधाळे याने गोळीबार करुन पळून जात असताना त्याच्या गाडीतील पेट्रोल संपले़ तेव्हा त्याने एका ठिकाणी गाडी लावून तो वनाजला आला तेथून त्याने बाटलीत पेट्रोल घेतले़ एकाची लिफ्ट घेऊन तो पुन्हा गाडी ठेवली तेथे जात असताना पोलिसांनी नाकाबंदीत त्याला पकडले़. समीर येनपुरे अाणि अारेपी मधाळे हे एकाच भागात राहणारे अाहेत. मधाळे याची टपरी काही दिवसांपूर्वी महापालिकेने हटवली. येनपूरे यांनी महापालिकेकडे टपरीबाबत तक्रार केल्याची शंका मधाळे याला हाेती. याच रागातून अाज सकाळी 11 वाजता येनपुरे हे विद्यापीठ चाैकात सिग्नलला थांबले असता मधाळे याने मागून दुचाकीवरुन येत येनपुरे यांच्या डाेक्यात गाेळी मारली. गाेळी येनपुरे यांच्या डाेक्याला चाटून गेली. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी विविध पथके अाराेपीच्या शाेधासाठी पाठवली हाेती. 

Web Title: police arrest the shutter of pune university circle incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.