PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 07:26 PM2019-10-14T19:26:11+5:302019-10-14T19:26:32+5:30

३८३० कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. 

PMC Bank scam: ED seizes over 2 crore assets | PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

googlenewsNext

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) घोटाळ्या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पीएमसी बँक अधिकारी, एचडीआयएलचे संचालक आणि प्रमोटर्स यांची ३८३० कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. 
पीएमबी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंह यांच्या खात्यात ईडीला दहा कोटी रुपये सापडले आहेत, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेकडो कोटीच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे. ईडी लंडन आणि दुबईमधील मालमत्तांचाही शोध घेत आहे. तेथील मालमत्तांचा वाधवा यांच्याशी काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.

Web Title: PMC Bank scam: ED seizes over 2 crore assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.