PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:57 PM2019-10-04T21:57:31+5:302019-10-04T22:00:26+5:30

सविस्तर तपशील मिळविण्यात येत असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

PMC bank scam : ED searched 6 places | PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी

PMC बॅँक गैरव्यवहार : ईडीची सहा ठिकाणी छापेमारी

googlenewsNext
ठळक मुद्देईडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून अतिरिक्त पुरावे मिळविले जात आहेत. पीएमसी बॅँकेचे देशभरात १३७ शाखा असून ११ हजार कोटीवर ठेवी आहेत.

मुंबई - पीएमसी कोट्यावधीच्या घोटाळ्यात आता सक्तवसूली संचालनालयाने (ईडी)लक्ष घातले असून शुक्रवारी याप्रकरणी मुंबई व परिसरात सहा ठिकाणी छापे घातले. बॅँकेच्या शाखा व संचालक, अधिकाऱ्यांच्या कार्यालये व निवासस्थाने छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पीएमसी बॅँकेत गेल्या अकरा वर्षात जवळपास ४ हजार ३३५ कोटीचा घोटाळा झाल्याचे लेखापरीक्षण व प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये बॅँकेचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॅण्ड्रींग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून गुरूवारी घोटाळ्याशी संबंधीत हाउसिंग डेव्हल्पमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक राकेश वाधवा व त्यांचे बंधू सारंग वाधवा यांना अटक केली आहे. ईडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून अतिरिक्त पुरावे मिळविले जात आहेत. आरबीआयने नियुक्त केलेल्या लेखापालने दिलेल्य तक्रारीनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. पीएमसी बॅँकेच्या भांडूप येथील शाखेतून एचडीआयएलने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामध्ये अनियमितता असून बॅँकेच्या संचालक, व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही कर्ज मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा सविस्तर तपशील मिळविण्यात येत असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
पीएमसी बॅँकेचे देशभरात १३७ शाखा असून ११ हजार कोटीवर ठेवी आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने आरबीआयने या बॅँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. सभासदांना सहा महिन्यात १० हजार काढण्याची मुभा होती, आता ही मर्यादा २५ हजारापर्यत करण्यात आली आहे. मात्र, या निर्बंधामुळे खातेदारांचे मोठे हाल होत आहेत.

 

Web Title: PMC bank scam : ED searched 6 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.