PMC Bank scam case: Wadhwa father and son's ED custody extended | पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ
पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ

ठळक मुद्देमंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची आणखी मुदतवाढ देण्यात आली.पीएमसी बॅँकेचे शेकडो खातेदार आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत.

मुंबई - पंजाब अ‍ॅण्ड महाराट्र सहकारी बॅँकेचे (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केलेल्या (ईडी) एचडीआयएलएफचे प्रमुख राकेश वाधवान व त्याचा मुलगा सारंग याच्या कोठडी २४ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची आणखी मुदतवाढ देण्यात आली.

पीएमसी बॅँकेत आतापर्यंत तपासात साडेपाच हजारावर कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एचडीआयएलएफ या कंपनीचा मोठा वाटा असल्याने वाधवान पिता-पूत्रांना मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर १८ ऑक्टोबरने ईडीने दोघांचा ताबा घेतला. याप्रकरणी मनी लॅण्ड्रीग अतर्गंत गुन्हा दाखल करुन एचडीआयएलएफचे साडे तीन हजार कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्याकडील चौकशी प्रलंबित असल्याने त्यांना आणखी दोन दिवसाची मुदत वाढ देण्यात आली. दरम्यान, पीएमसी बॅँकेचे शेकडो खातेदार आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत.

Web Title: PMC Bank scam case: Wadhwa father and son's ED custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.