पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:57 PM2019-10-16T21:57:21+5:302019-10-16T21:59:35+5:30

न्यायालयात सादर केला अर्ज

PMC Bank scam case: ED wants custody of father-son, waryam Singh | पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा

Next
ठळक मुद्देतिघेजण मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.मुंबई पोलिसांकडून त्यांचा ताबा मिळावा, यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबई - हजारो खातेदारांना आर्थिक अरिष्टात सोडण्यास कारणीभूत ठरलेल्या पंजाब महाराट्र बॅँकेचे (पीएमसी) माजी अध्यक्ष वरयाम सिंग व एचडीआयएलएफचे प्रमुख वाधवान पिता-पूत्र वाधवान यांचा ताबा मिळावा, यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)बुधवारी न्यायालयात अर्ज सादर केला.

तिघेजण मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. पीएमसी बॅँकेत आतापर्यतच्य तपासात साडेपाच हजारावर कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एचडीआयएलएफ या कंपनीचा मोठा वाटा आहे. त्यांना साडे सहा हजार कोटीचे कर्ज मिळवून देण्यात तत्कालिन अध्यक्ष व भाजपाचे आमदार तारासिंग यांचे पूत्र वरयाम सिंग यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासह एचडीआयएलएफचे प्रमुख राकेश वाधवान व त्यांचे पूत्र सारंग यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनी लॅण्ड्रीग अतर्गंत गुन्हा दाखल करुन एचडीआयएलएफचे साडे सहा हजार कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. अद्यापही ही कारवाई सुरु असून त्यांच्याकडे चौकशी करावयाची असल्याने त्यांना ईडीने ताब्यात घ्यायचे आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांचा ताबा मिळावा, यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात अर्ज केला आहे. तो राखीव ठेवण्यात आला असून तो राखीव ठेवण्यात आला आहे.

Web Title: PMC Bank scam case: ED wants custody of father-son, waryam Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.