जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:07 IST2021-12-01T20:06:24+5:302021-12-01T20:07:41+5:30
Crime News : पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. पतीने असा आरोप आहे की, पत्नीने मासिक पाळीचे रक्त जेवणात मिसळले आणि ते तिच्या पतीला दिले, ज्यामुळे त्याला गंभीर संसर्ग झाला. या व्यक्तीने गेल्या वर्षी १२ जून रोजी पत्नी आणि तिच्या पालकांविरुद्ध कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डाच्या अहवालानंतर गाझियाबाद पोलीस पुढील कारवाई करतील.
एफआयआरमध्ये त्याच्या दाव्यांची शहनिशा करण्यासाठी त्या व्यक्तीने वैद्यकीय अहवालही सादर केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून, कवी नगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादंवि कलम ३२८ आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडल्यानंतर पतीची वैद्यकीय चाचणी केली, असा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. तपासणीत त्याच्या शरीरात संसर्ग झाल्यामुळे सूज असल्याची माहिती समोर आली.
२०१५ मध्ये लग्न झाले
वास्तविक, तक्रारदार व्यक्तीचे २०१५ साली लग्न झाले होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने वारंवार सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरला, परंतु पती आई-वडिलांना सोडण्यास तयार नव्हता. यावरून त्यांच्यात अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होत होती.
जादूटोण्याचाही आरोप
पीडित महिलेचा आरोप आहे की, महिलेच्या आई-वडिलांनी आणि तिच्या भावाने तिला जेवणात 'विष' टाकण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध 'विविध प्रकारचे जादूटोणा' वापरण्यास प्रवृत्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.