चेंबूर येथे पेट्रोल पंपचा स्लॅब कोसळला; दोन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 16:31 IST2019-01-03T16:29:19+5:302019-01-03T16:31:09+5:30
आज दुपारी 12.36 वाजताच्या सुमारास या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून दोन जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) दाखल करण्यात आले आहे.

चेंबूर येथे पेट्रोल पंपचा स्लॅब कोसळला; दोन जण गंभीर
ठळक मुद्देपेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे दोन जण गंभीर जखमी लालचंद ढोलपुरिया (26) आणि जतीन मंडलीक (25) अशी जखमींची नावं आहेत. आज दुपारी 12.36 वाजताच्या सुमारास या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली
मुंबई - चेंबुर पूर्व येथील छगन मीठा पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लालचंद ढोलपुरिया (26) आणि जतीन मंडलीक (25) अशी जखमींची नावं आहेत. यातील एक जण पेट्रोल पंपावरील कर्मचारी असून दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला दुचाकीस्वार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज दुपारी 12.36 वाजताच्या सुमारास या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून दोन जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन) दाखल करण्यात आले आहे.
चेंबूर येथे पेट्रोल पंपचा स्लॅब कोसळला; दोन जण गंभीर
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 3, 2019