शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन ऑर्डर केले कीटकनाशक, ते खाऊन झाला मृत्यू! वेबसाईटच्या संचालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:48 IST

Suicide Case : वास्तविक, गाझियाबादमधील मसुरी पोलिस ठाण्यात एका भारतीय ई-कॉमर्स वेबसाइटच्या संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे.

गाझियाबाद - जगभरातील लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरून सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करतात. सुईपासून ते जहाजापर्यंत ऑनलाइन खरेदी केली जाते. पण, वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा वापर कसा होतो, याची जबाबदारीही या शॉपिंग वेबसाइट्सची असेल का? वास्तविक, गाझियाबादमधील मसुरी पोलिस ठाण्यात एका भारतीय ई-कॉमर्स वेबसाइटच्या संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे.

वेबसाइट संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकविरोधात गुन्हा गाझियाबादमधील अब्दुल वाहिद या तरुणाने ऑनलाइन विष मागवून त्याचा आत्महत्येसाठी वापर केल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच शॉपिंग वेबसाइटवरून ऑर्डर केलेले विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. आता त्याच्या नातेवाइकांनी वेबसाईटचे संचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.विष ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि खाल्ल्याने मृत्यू झालामिळालेल्या माहितीनुसार, मसुरीच्या खांचा रोडवर राहणारा २४ वर्षीय अब्दुल वाहिद हा कॅब ड्रायव्हर होता. काही काळ त्याचे उत्पन्न फारसे नव्हते आणि फारशी बचतही शिल्लक नव्हती. कोरोनामध्ये लावलेल्या कर्फ्यूमुळे त्याच्याकडे पैशांची कमतरता भासू लागली, त्यामुळे अब्दुल आर्थिक चणचण असल्याने नैराश्यात होता. असे सांगितले जात आहे की, 25 सप्टेंबर 2021 रोजी त्याने एका प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइटवरून कीटकनाशके खरेदी केली. त्याची डिलेव्हरी मिळाली. त्यानंतर अब्दुलने विष प्राशन करून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने स्वत: सांगितले की, त्याने ऑनलाइन विष मागवले होते.ही बाब मृताच्या नातेवाईकांच्या वकिलाने सांगितलीमृत अब्दुलच्या कॅबमध्ये कीटकनाशकाचे रॅपर सापडल्याचे सांगण्यात येत आहे. अब्दुलची प्रकृती खालावल्याने त्याला शहरातील सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अब्दुलचा मृत्यू झाला. त्याचवेळी मृत अब्दुलच्या नातेवाईकांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखलयाबाबत वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मसुरी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी गुन्हा दाखल केला. संचालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Deathमृत्यूonlineऑनलाइनPoliceपोलिसCourtन्यायालय