समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 19:35 IST2018-09-28T19:33:29+5:302018-09-28T19:35:16+5:30
कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे.

समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद
पुणे : कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे.
अनुराग कमलेश भाटिया (वय २३, रा. कृष्णकमल सोसायटी, सुस-पाषाण रोड) यास १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. आरोपीने शौचाचा बहाणा क्नरून २३ सप्टेंबरला कमलनयन हॉंस्पिटल (शुक्रवार पेठ) येथून खिडकीद्वारे पळ काढला होता. याबाबत खडक गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आरोपी पळुन गेलेनंतर त्याचा खडक पोलिसांनी प्रथम पुणे व नंतर माहितीनुसार मुंबई येथे जाऊन गेले ४ दिवस सतत पाठलाग सुरू ठेवला होता. आरोपीने नवीन मोबाइल घेऊन कधी कधी वापर करीत होता. कुठेही मुक्काम न करता किंवा न थांबता आरोपी सतत पुणे मुंबई पुणे फिरत होता. मागील ४ दिवस सतत आरोपीचा पाठलाग करून मुंबई पोलीस भोईवाडा पोलीस पोलीस स्टेशन डीबी पथक व गुन्हे युनिट-४ यांच्या मदतीने शुक्रवारर मुंबई परेल येथे आरोपीस पकडण्यात आले असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
समलैंगिक पार्टनवर गाढ झोपेत असताना त्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली होती.
याबाबत ४६ वर्षीय पार्टनरने फिर्याद दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शुक्रवार पेठेत हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणाचे दुचाकीचे शोरुम आहे़ त्याचा शुक्रवार पेठेत अलिशान बंगला आहे. तर, आरोपी हा काहीही कामधंदा करीत नसून त्याचा दुसरा गे मित्र त्याचा सांभाळ करतो़.