शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

१९८४ च्या दंगलीतील राज्यातील मृतांच्या वारसांना पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:23 PM

या वर्षासाठी चौघांना १.२० लाखाची मदत; केंद्राची निवृत्तवेतन योजना

ठळक मुद्देदरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला त्याबाबतच्या निधीची तरतूद केली जात असते.चार मृतांच्या वारसांना वर्षाला प्रत्येकी ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जमीर काझीमुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीमधील मृतांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या निवृत्तीवेतनाचा लाभ राज्यातील चौघांना मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी द्यावयाची मदतीला अखेर ‘मुर्हूत’ मिळाला असून चौघांसाठी १.२० लाखाचा निधी राज्य शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अहमदनगर व बुलढाणा जिल्ह्यातील हे लाभार्थी असून त्यांच्या १२ महिन्याची रक्कम संबंधित विभागीय आयुक्तालयाकडे सर्पूद करण्यात आली असल्याचे महसूल विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून हत्या झाल्यानंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हिंसाचार केला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली होती. त्याचे पडसाद दिर्घकाळ राजकारणात होत राहिले. दंगलीला जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करुन खटला दाखल करण्यात आले होते. या दंगलीची चौकशी न्या. नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेल्या शिफारशीनुसार १६ जानेवारी २००६ रोजी केंद्रातील तत्कालिन युपीए सरकारने दंगलीतील मृतांच्या वारसांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला. या दंगलीमध्ये राज्यातील चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पात्र वारसांना मदत देण्यात येत होती. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरवातीला त्याबाबतच्या निधीची तरतूद केली जात असते.

मात्र, २०१९-२० या आर्थिक वर्षातील निवृत्ती वेतन संबंधितांना अद्याप देण्यात येत नव्हते. आर्थिक वर्ष संपण्याला अडीच महिन्याचा अवधी असताना अखेर महसूल विभागाने त्याबाबतची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग केली आहे. प्रत्येक महिन्याला अडीच हजार याप्रमाणे चार मृतांच्या वारसांना वर्षाला प्रत्येकी ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक व अमरावती विभागीय आयुक्तालयाकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांपर्यत ती पोहचविली जाणार आहे.दंगलीतील राज्यातील मृत व त्यांचे वारस१९८४ ला झालेल्या भीषण दंगलीमध्ये राज्यात रहिवासी असलेल्या चौघाजणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पिरु उर्फ पिरन हसन सय्यद व सतपाल सिंग नंदपालसिंग तर बुलढाणा जिल्ह्यातील दिनकर सिताराम डाबरे हे मृत्यूमुखी पडले होते. पिरु यांची आई सुग्रबी सय्यद यांना तर उर्वरित तिघांच्या पत्नींना पात्र वारसदार म्हणून निश्चित केले आहे. त्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलIndira Gandhiइंदिरा गांधीbuldhanaबुलडाणाAhmednagarअहमदनगर