‘पतंजली’ची एजन्सी देण्याच्या बहाण्याने ११ लाखाला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 21:53 IST2019-02-24T21:53:12+5:302019-02-24T21:53:31+5:30

रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची उत्पादनाची एजन्सी देण्याच्या बहाण्याने एका वृद्धाला तब्बल ११ लाखाला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 For the payment of 'Patanjali' agency, 11 lacs | ‘पतंजली’ची एजन्सी देण्याच्या बहाण्याने ११ लाखाला गंडा

‘पतंजली’ची एजन्सी देण्याच्या बहाण्याने ११ लाखाला गंडा

मुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची उत्पादनाची एजन्सी देण्याच्या बहाण्याने एका वृद्धाला तब्बल ११ लाखाला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अझीझ हकीम बर्नी (वय ६६) यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात दोघा जणाविरुद्ध तक्रार दिली आहे. गेल्या पाच वर्षापासून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेवूनही उत्पादने न पुरविल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

चार फेब्रुवारी २०१३ मध्ये बर्नी यांच्या ईमेलवर भामट्यांनी मेल पाठवून पतंजली कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून त्यांना औषधे व फुड कॉस्मेटिकची एजन्सी देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावरुन पैसे घेतले. करार करण्यासाठी पतंजलीची बनावट कागदपत्रे पाठविली. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही पतंजलीची उत्पादने न पाठविल्याने फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तक्रार दिली.

Web Title:  For the payment of 'Patanjali' agency, 11 lacs