कल्याणमध्ये मंडप डेकोरेटरला देशी पिस्तुलासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 21:44 IST2019-04-20T21:43:47+5:302019-04-20T21:44:47+5:30
मंडपचा व्यवसाय करणाऱ्या अनिल भोसले (रा. बदलापूर) याला बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास अटक केली.

कल्याणमध्ये मंडप डेकोरेटरला देशी पिस्तुलासह अटक
कल्याण - मंडपचा व्यवसाय करणाऱ्या अनिल भोसले (रा. बदलापूर) याला बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसासह हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भोसले पश्चिमेतील आंबेडकर रोडजवळील तपोवन बिल्डींग नजीक मंडप डेकोरेशनच्या कामासाठी आला असताना गस्तीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांना संशय आल्याने त्यांनी भोसलेची चौकशी करत झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व ५ जिवंत काडतूस आढळून आली. अनिल याने आपल्या मित्राकडून छंद म्हणून हे पिस्तुल विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र या पिस्तुलाचा कोणताही परवाना त्याच्याकडे नसल्याचे चौकशीअंती समोर आले...